आंवढी,वार्ताहर : आंवढी ते जाधववाडी दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात येत आहे,अशी तक्रार संरपच आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे.
आंवढी ते जाधववाडी हा अनेक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे.सध्या डांबरीकरणापुर्वी मुरमीकरण करण्यात येत आहे.
त्यात खडीवर थेट माती टाकून रोलींग करण्यात येत आहे,ते व्यवस्थितही करण्यात येत नाही,शिवाय पाणीही मारले जात नाही,असा आरोपही कोडग यांनी केला आहे.या रस्त्याचे मजबूतीकरण व मुरमीकरणाचे काम नियमबाह्य केले जात आहे.हे काम सब ठेकेदार करत असून त्यांच्याकडून शासनाचे नियम ढाब्यावर बसविण्यात आले आहेत.शासनाचे प्रतिनिधी असणारे अभियंते कधीतरी या कामाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ कार्यालयातील अधिकारीही थेट ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दर्जेदार रस्ता करावा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असाही इशारा कोडग यांनी दिला आहे.