जत : जत-विजापूर महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.या वाहतूक कोंडीसाठी नेमलेले पोलीस गायब होत असल्याने बेजबाबदार वाहन चालकामुळे वाहने आडवी,उभी करतात.परिणामी एकादे अवजड वाहन आल्यास तास् तास् वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते काम करणाऱ्या कंपनीकडूनही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही.पोलीसही याकडे लक्ष देत नसल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.