माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील माडग्याळ येथे अस्तित्वात असलेल्या महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय प्रशासनाकडून सनमडी येथे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत़ मुख्य व मध्यवर्ती ठिकाणावर हे कार्यालय असून गैरसोयीच्या आणि आडमार्गावर हे कार्यालय हलविले जात आहे.हे कार्यालय सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने माडग्याळ याचठिकाणी रहावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.कार्यालय स्थलातरास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून यदाकदाचित जर तसे झाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
उपविभागीय कार्यालय संख अंतर्गत माडग्याळ शाखा कार्यालय सध्यस्थितीत भाडे तत्वावर कार्यरत आहेत. तथापी येथील शाखा कार्यालय इमारतीचा भाडे करार संपुष्टात आलेला असुन पुढील भाडे वाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आले आहे. तथापी संचालक (विवले) मुंबई यांचे परिपत्रकानुसार मधील
दिलेल्या आदेशानुसार भाडे तत्वावरील कार्यालय कंपनीच्या जागेमध्ये स्थलांतरित करुन भाडे रक्कमेमध्ये बचत करणेबाबत सुचित केलेले आहे.
त्याअनुषंगाने सदरचे माडग्याळ येथील कार्यालय कंपनीच्या जागेमध्ये स्थलांतरित करणेत
यावेत,असा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याने माडग्याळ येथील शाखा कार्यालय सनमडी येथील स्वतःच्या इमारतीत हलवण्याचा घाट घातला जात आहे.सध्या माडग्याळ येथील एका मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीत भाडेतत्वावर महावितरण कंपनीचे कार्यालय कार्यरत आहे़.माडग्याळ मध्यवर्ती गावात हे कार्यालय असल्याने माडग्याळसह सोन्याळ, जाडरबोबलाद, व्हसपेठ, लकडेवाडी मायथळ, सनमडी,काराजनगी, कोळगेरी, कुणिकुणूर, आदी गावातील बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरले आहे़.
तसेच शेतकऱ्यांना हे कार्यालय जत- चडचण या राज्य महामार्गावर माडग्याळमध्ये असल्याने वाहतुकीची सोय चांगली होते. शिवाय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी आणि मोठा बाजारपेठेच्या गावात असल्याने शेतकऱ्यांना जाणे येणे इतर कामे करून घेणेही सुलभ होते़. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय सनमडी सारख्या आडवळणी आणि गैरसोयीच्या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे़.
ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे़ तसेच या मार्गावर वाहतूकीची कोणतेही साधन नाही आणि पक्क्या रस्त्याअभावी कठीण बनणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व राजकिय पदाधिकाऱ्यांनी केला आहे़. हे कार्यालय माडग्याळ सोडून अन्यत्र हलवू यासाठी राजकीय प्रयत्नही सुरु आहेत़. अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जत पंचायत समितीचे माजी सदस्य व माडग्याळचे माजी सरपंच सोमणा हाक्के यांनी दिला आहे.