जत,प्रतिनिधी : औरंगाबाद येथुन प्रकाशित होणाऱ्या एका दैनिक वर्तमानपत्रातून शिक्षकाबद्दल बेताल व अपमानकारक वक्तव्य केल्याचे आढळून आले आहे. म्हणून असे विकृत लेखन करणाऱ्या मनोवृतीच्या संपादकाचा सांगली माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.शिक्षकांबददल अपशब्द वापरल्याबददल त्यांनी शिक्षकांची जाहिर माफी मागावी.
तसेच संपादकीय सदराखाली समाजामध्ये शिक्षकांविषयी विद्वेषजनक व चेतावणीखोर लेखन ठळक पणे प्रसिध्द केल्याबददल दैनिकाचे संपादक व प्रकाशक यांच्या विरूध्द पोलीसांनी कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.तसे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर,सचिव बळीराम कसबे उपस्थित होते.







