डफळापूर येथे मांडूळाची विक्री करणार्‍यास अटक‌ | दीड‌ लाखाचा‌ मुद्देमाल जप्त | उपा उपअधिक्षक कार्यालयाची‌ कारवाई

0
4





जत,प्रतिनिधी : डफळापूर (ता.जत) येथे मांडुळाची विक्रीच्या उद्देशाने आलेल्या एकाला पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडील पथकाने अटक केली. विकास तानाजी बजबळे (वय 25, रा. लोणारवाडी, ता.कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून याबाबत वन विभागाकडे कारवाईची नोंद झाली आहे.








संशयिताला जत न्यायालयात हजर केले असता 15 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.वनविभाग व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून डफळापूर गावात रवीवारी ता.8 ला रात्री आठच्या सुमारास मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती.नवले यांनी माहितीच्या आधारे  पथक पाठविले,घटनास्थळी जाऊन सापळा लावला.दरम्यान, विकास बजबळे हा दुचाकीवरून दीड लाख किंमतीचा तसेच 2 फूट 9 इंच लांबीचा मांडूळ विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे मिळून आले.








त्याला ताब्यात घेत‌ पोलीस व वनविभागच्या‌ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सोमवार ता.9 रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते, पोलिस सुनिल व्हनखंडे, विजय अकुल, वाहिद मुल्ला, आदीच्या पथकाने कारवाई केली. संशयित आरोपी विकास बजबळे याला अटक करून वनपाल गोविंद पवार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान वनविभागाचे वनक्षेत्रपाल महादेव मोहिते, परिमंडळ वन अधिकारी चंदु ढवळे, गणेश दुधाळ, आपासाहेब नरूटे, पवार यांनी पुढील प्रक्रिया पुर्ण केली आहे.







डफळापूर ता.जत येथे जप्त केलेल्या मांडूळासह संशयित युवक व वनविभागाचे पथक

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here