जत,प्रतिनिधी : खलाटी (ता. जत) एकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. दिलीप शिवराम मलमे (वय 50) असे मुत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात खलाटी गावचे पोलिस पाटील भाऊसाहेब शेजुळ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप मलमे हे दुपारी घरी जात असताना त्यांचा आपल्या घरा जवळ असलेल्या विहिरीत तोल गेला व ते विहिरीत पडले.त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून अधिक तपास श्री.हाक्के करत आहेत.







