जत,का.प्रतिनिधी : जत तालुक्यातील डफळापूर,बिळूर,शेगाव,माडग्याळ, उमदी,संख,दरिबडची या भागामध्ये खासगी कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या मोबाइल नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मागील वर्षभरामध्ये या कंपन्यांची सेवा सुधारत नसल्याने व कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींकडे बघण्यासाठी वेळच नसल्याने नागरिक आता अधिक आक्रमक झाली असून, मोबाइल टॉवर असणाऱ्या ठिकाणी धडक देऊ, असा इशारा दिला आहे.
तालुक्यातील मोठी बाजारपेठ व प्रमुख शासकीय कार्यालय असलेल्या जत शहरलत्याचप्रमाणे मोठ्या लोकसंख्येची गावे
डफळापूर,संख,उमदी,माडग्याळ,दरि
ग्राहकांनी अनेकवेळा कंपन्यांच्या ग्राहक सेवेकडे तक्रार नोंदवूनदेखील कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आली आहे.या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांतून कोणताही उद्रेक होऊ नये म्हणून तालुक्यातील शासकीय अधिकारी वर्गाकडून याबाबत मोबाइल कंपनीला सेवा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तर लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत मोबाइल कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाकडे तक्रारी देऊनही यामध्ये अजिबात बदल होत नसल्याचे पाहून अखेरीस मोबाईक धारक आक्रमक
होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या कोविडच्या प्रचंड साथीमुळे शाळा भरत नाहीत त्यावर ऑनलाइन शिक्षण देण्याचे शासनाचे पत्रक आहे. परंतु जत तालुक्यातील जवळपास सर्वच गावात मोबाइल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क एवढे खराब आहे की त्यामुळे कोणत्याही प्रकारे ऑनलाइन अभ्यास होत नसल्याने पालक वर्गाने काय करावे, हाच मोठा प्रश्न आहे.