जत,प्रतिनिधी : जत येथील तुळजाराम भिमराव शिंदे (रा.जत)यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे (वय 27,रा.शंकर कॉलनी जत) याला जत पोलीसांनी गुरूवारी अटक केेेली.
अधिक माहिती अशी, जत येथील भंगार व्यवसायिक सुभाष वाघमोडे यांने 23 ऑक्टोंबरला सायकांळी 5.30 च्या दरम्यान फिर्यादी तुळजाराम शिंदे हे वाघमोडे यांच्या भंगार दुकानात गेले असता,सुभाष वाघमोडे यांने त्यांच्या लंगडण्याचे कारणावरून चिडवून वाईट वगाळ शिवीगाळ करत दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देत पाईपने पाय,मांडी, पोट व पाठीवर मारहाण केली होती.
जखमी फिर्यादी तुळजाराम शिंदे यांनी 23 ऑक्टोंबरला जत पोलीसात फिर्याद दिली होती.पोलीसांनी 324,323,504,506,34,सह अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 चे कलम 9 अतर्गंत गुन्हा दाखल केला होता.गुरुवारी सुभाष वाघमोडे याला पोलीसांनी अटक केली.आतापर्यत सुभाष वाघमोडे यांच्यावर 7 वेगवेगळे गंभीर गुन्हे जत पोलीसात दाखल आहेत.
शुक्रवारी त्याला शेषण कोर्ट सांगलीमध्ये हजर केले जाणार आहे.अधिक तपास पोलीस नाईक प्रविण पाटील करत आहेत.









