पावसाने द्राक्षबागाचे वाटोळे | औषधाचा खर्च वाढला : बागात साचले पाणी ; चिंता वाढली

0
5



जत,प्रतिनिधी : सातत्याने होणारा मुसळधार पाऊस,ढगाळ वातावरण यामुळे जत तालुक्यातील द्राक्षबागायत दारांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील अनेक बागात पाणी साठले आहे.यामुळे मुळाची वाट खुंटली आहे.तर बिघडलेल्या वातावरणाचे ऑक्टोंबर छाटणी घेतलेल्या बांगावर सलग तिसऱ्या वर्षी दावण्या रोगाचे संकट उभे राहिले आहे.यामुळे औषधाचा खर्च वाढल्याने कोरोनाचा फटका बसलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.





तालुक्यात 11 हजार एकरावर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत.पुर्व उमदी,सिध्दनाथ,संख,बालगाव,हळ्ळी,कागनरी,बेळेंडगी,मुंचडी,जाळीहाळ खुर्द,दरिकोणूर,जाळीहाळ बुद्रुक तर पश्चिम भागात डफळापूर, मिरवाड,बेंळूखी,कुंभारी,शेगाव,बनाळी,वायफळ,तिप्पेहळळी,खलाटी,बिळूर,जिरग्याळ या बागात द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.या भागातील शेतकरी ऑक्टोंबर महिन्यात छाटणी घेतो,त्यांनतर साधारणत; चार महिन्यानंतर नैसर्गिक द्राक्षे तयार होतात. बेदाणा व मार्केटसाठी दर्जेदार उत्पादन घेतले.तालुक्यात गेल्या पंधरवड्यात मुसळदार पाऊस पडत आहे.







यांचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे.काही बागायतदारांनी ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी घेतली आहे.काही बागा पोंका स्टेजला आहेत.तर काही फुटू लागल्या आहेत.मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या वातावरण बदलामुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे.दुष्काळाच्या झळा सोसत कष्ठाने द्राक्षबागा उभारल्या आहेत.बागेच्या जोरावर शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन केले आहे. पावसामुळे यापुढे पिक येईपर्यत त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात बिघडलेल्या निसर्गांच्या प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.छाटण्या खोळबंल्या आहेत.







मुसळधार पावसामुळे बागा पाण्यात  


मुसळधार पावसामुळे अनेक द्राक्षबागात पाणी साचले आहे.बागेतही जाता येत नाही. काड्यावर यांचा मोठा परिणाम होणार आहे.







दरिबडची ता.जत येथील अमोल शेंडगे यांच्या बागेत पाणी साचले आहे.


अवकाळीने लावली शेतकऱ्यांची वाट








उमदी,वार्ताहर : जत तालुक्यात गेल्या पंधरवड्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेतीपिंकाची वाट लावली आहे.चालू आठवड्याततर पावसाने कहर केला असून सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे मका पिकांसह भाजीपाला,द्राक्ष,डाळींब बागायचदारांचा तोंडचे पाणी पळविले असून डोळ्यात देखत झालेले नुकसान बघून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.पाहणी दौऱ्यांचे पर्यटन करण्या पेक्षा आम्हाला मदतीची गरज आहे.तात्काळ द्या,अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. कोरोना व आता अतिवृष्ठी असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here