जत शहरातील रस्ते बनले घसरगुंडी

0
6



जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासनाच्या खाऊ धोरणामुळे शहरातील अंतर्गत रस्ते घसरगुंडी,दलदलयुक्त बनले आहे.

शहरातील जवळपास सर्वच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य बनले आहे.तातडीने हे रस्ते दूरूस्त करावे,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.






शहरातील सर्वत्र झालेल्या सांडपाणी,दुर्गंधीचे साम्राज्य वाढत असून रोगराईला एक प्रकारे आमंत्रण दिले जात आहे.जत शहरातील अंतर्गत रस्त्याचा विकास,सांडपाणी वाहणाऱ्या नाल्याची कामे दर्जाहीन झाल्यामुळे सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाची पाणी सांडपाणी साचत डबकी तयार झाली आहे.







अनेक मातीमय रस्त्यावरून पायी चालणेही कठीण बनले आहे. रिमझिम पावसात रस्त्यावर फुटभरा पेक्षाही जास्त पाणी साचत आहे. सर्वत्र कोरोनानी थैमान घातले असताना शहरातील रस्त्यावर सांडपाणी गोवा होत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नगरपरिषदेची पाईपलाईन ही मूळची ग्रामपंचायत असतानाची याच पाईपलाईनवर नगरपरिषद रेगोट्या मारण्याचे काम करत आहे.







अनेक ठिकाणी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे फुटल्या आहेत.या फुटलेल्या पाईप मधून गटारीचे पाणी, सांडपाणी आणि पावसाचे पाणी पाईपलाईन मध्ये जात आहे. हेच पाणी नगरपरिषद नागरिकांना पुरवठा करते.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात गेले आहे.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here