जत,प्रतिनिधी वळसंग ता.जत येथे बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत 26,340 रूपयाच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
अवैध धंद्यावर कारवाई
उपविभागीय पोलीस कार्यालय हदीत जत,कवठेमहांकाळ, उमदी पोलीस
ठाणेकडील अवैध धंद्यावर कारवाई करणे यावत मा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या आदेशाने प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे जत पोलीस ठाणेच्या हदीत वळसंग गावी अनिल विठ्ठल केंगार वळसंग ता.जत हा त्यांच्या घराशेजारी असलेल्या झोपडीमध्ये बेकायदेशीर दारु विक्री करीत असलेबाबत बातमी मिळालेने उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या आदेशाने त्यांचे कार्यालयाकडील पोना विजय अकुल,सुनिल व्हनखंडे,वाहीदअली मुल्ला,अभिजीत
यमगगर यांनी नमूद बातमीचे ठिकाणी आज दुपारी सव्वा तीन वाजता छापा टाकून सदर छाप्यात एकूण 6 देशी संत्र कंपनीच्या बॉक्स,2 विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स त्यामध्ये एकुण 281 देशी दारूच्या बाटल्या व विदेशी दारूच्या 54 बाटल्या असा एकूण 26,340/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला
आहे.
पोलीस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम प्रमाणे संशयित आरोपी अनिल विठ्ठल केंगार रा.वलसंग ता.जत याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.