मका पिकाला कोंब | डफळापूर परिसरातील शेकडो एकर मक्याचे पिक पाण्यात

0
5





डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.






सर्वाधिक नुकसान मका

पिकांचे झाले असून खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्यातील काढणी सुरू असलेल्या शेकडो एकरमधील मक्याचे पिक सलग चार दिवस भिजल्याने त्याला कोंब फुटले आहेत.







पश्चिम भागातील हमखास उत्पादन मिळवून देणाऱ्या मका पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून या पिकांचे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी,सांगली बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण यांनी केली आहे.






डफळापूर ता.जत येथे मळणीनंतर साठवण करून ठेवलेल्या मक्याला कोंब फुटले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here