महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ; ना.विश्वजीत कदम

0
8



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करावेत, नुकसानीचा एकत्रित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्यात यावा,असे आदेश राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली. 








महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकर्‍यांच्या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे केले जातील, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली जाईल,असा विश्वास डॉ. कदम यांनी दिला.







जत तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कुडणूर,डफळापूर,जत,येळवी येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर पंचायत समिती येथे कोरोना, कृषीसह इतर विषयासंदर्भात आढावा घेतला. यावेळी आ.विक्रमसिंह सावंत, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, बीडिओ अरविंद धरनगुत्तीकर, आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







 



यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. ती वाढू नये,यासाठी शासनाची “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम चांगली राबवा. एकही घर वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या. असे आदेश दिले. यावर गोंधळेवाडी गावात एकही सर्वेक्षण झाले नसून ग्रामस्थांनी विरोध केला आहे. असे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी निदर्शनास आले. यावर राज्यमंत्र्यांनी सहकार्य करत नसेल त्याठिकाणी कारवाई करा, अशा सूचना दिल्या.यावेळी अजिंक्यविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव मिरज तालुका लहान असून 16 वेदर स्टेशन आहे. 









मात्र, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात आठच आहेत. त्यात वाढ व्हावी, अशी मागणी केली. याबाबत विचार करून लवकरच वेदर स्टेशन उपलब्ध करण्यासाठी तरतूद करू असे डॉ. कदम यांनी सांगितले. 







  तसेच जत पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घरकूल व शौचालय मंजूर करण्यासाठी पाचशे रूपयांची मागणी करतात, अशा तक्रारी उपस्थितांनी केल्या. मंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.






जत पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलताना ना.विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सांवत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here