करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथील बोर नदीत वाहून गेलेल्या युवकांचा दुसऱ्यादिवशीही शोध लागलेला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळपासून सांगलीच्या जीवरक्षक टिमकडून वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात आला.
मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने जीवरक्षक टिमलाही त्यांचा शोध लागलेला नाही.दरम्यान आज पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर शोध घेण्यात येणार आहे. त्याशिवाय आज सांगलीतून बोटीही मागविण्यात येण्याची शक्यता आहे.
गुरूवारी (ता.15) सकाळी बोर नदीला आलेल्या बोर नदी पात्रावरील करजगी-भिवर्गी पुलावरून दुधाची वाहतूक करणारा ट्रँक्टर नदी पात्रात पलटी झाल्याने पिंटू भिमू धायगोडे (रा.सनमडी) हा टेम्पो चालक वाहून गेला आहे.गुरूवारी सकाळपासून उमदी पोलीस,स्थानिक नागरिकांनी युवकांचा शोध घेतला,मात्र त्यांनाही युवकांला शोधण्यात अपयश आले होते.पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. शुक्रवार सकाळी सांगलीच्या जीवरक्षक टिमला प्राचारण करण्यात आले होते.
टीमच्या सदस्याकडून नदी
पात्रात शोध घेण्यात आला. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह,नदीत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.







