नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ नुकसान भरपाई द्या : विक्रम ढोणे

0
16







जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील परतीच्या पाऊसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल विभाग व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे






गेल्या चार दिवसात जत तालुक्यात परतीच्या पाऊसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक पिकामध्ये पाणी उभे असून रब्बी हंगामाच्या पेरणी सुरू होत्या.त्यामध्येच पाऊस सुरू झाला असून काही ठिकाणी पेरलेले ज्वारी कोंब उबवले होते, त्यामध्ये पाणी उभे राहिल्याने कुजले आहेत. तर मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत.जोरदार पावसामुळे पुढेही पंधरा दिवस पेरण्या होणार नसल्याने हंगाम लांबला आहे.रब्बीमध्ये घेण्यात येणारे मक्याचे पीक,ऊस शेतीला फटका बसला आहे.त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारे द्राक्षे,डाळिंब बागांना संततधार पाऊसने रोगांचा धोका बंळावला आहे.






द्राक्षाची ऑक्टोंबर छाटणी केलेल्या बागांचे नुकसान झाले,दावण्या करप्या रोगाने बांगाना पछाडले आहे.नुकसानग्रस्त सर्व पिंकाचा महसूल व कृषी विभागाने संयुक्त त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,असेही ढोणे यांनी मागणी केली आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here