जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथील खून प्रकरणातील गोविंद नागेश लांडगे,मुरलीधर मधूकर वाघमारे, श्रीधर मधूकर वाघमारे या तिघा संशयित आरोपींना 14 तारखेपर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
कंठी येथील सराईत गुन्हेगार धनाजी मोटे यांचा 9 ऑक्टोंबरला खून करण्यात आला होता.तेव्हापासून तिघे संशयित फरारी होते.त्यांना रवीवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती येथून ताब्यात घेतले होते.त्यांना सोमवारी न्यायालयात उभे केले असता ता.14 ऑक्टोंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.यापुर्वी अटकेतील एकासही 14 ऑक्टोंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.