जतेत सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली.सायकांळी आलेल्या या पावसाने अनेक गावात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय. तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.जत शहरासह तालुक्यामधिल काही गावामध्ये रविवारी सायकांळी तुफान पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

जत शहरात पावसाचे तांडव पाह्याला मिळाले.शनिवारी सायकांळ व रात्री,सोमवारी सायकांळपासून सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित केले आहे.संपूर्ण शहरात पाणीपाणी झाले आहे.मुख्य रस्त्यावर पाणी वाहत होते.तर शहरातील गंर्धव गदीसह सर्व नाले तुंडूब भरून वाहले.


यामुळे शहरातील काही घरात पावसाचे पाणी घुसले.शहरभर तब्बल तीन तास कोसळत असलेल्या पावसाने नागरिकांचे बेहाल केले.विजापूर-गुहागर महामार्ग पाणीमय झाला आहे.थेट रस्त्यावरून नाले वाहत होते.दरम्यान तालुक्यातील पश्चिम, उत्तर,दक्षिण भागासह पुर्व भागातील काही गावात पावसाने झोडपले.जत-सांगली रस्त्यावरील रामपुर नजिकचा पुल काहीकाळ पाण्याखाली गेल्याने तासभर वाहतूक खोंळबळी होती.येथील ओढापात्रावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
Rate Cardरब्बीच्या पेरण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.पश्चिम भागात ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांना सलग दोन दिवसातील पावसाने रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.तर बागेत पावसाचे पाणी थांबून राहिल्याने मुळाची वाढ खूटून उत्पादन घटणार आहे.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या


जत पश्चिम भागात सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे.शनिवारी रविवारीही पावसाने तूफान पावसाने झोडपले आहे.त्यातच वादळी वाऱ्यासह परिसरातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.फळ छाटणी केलेल्या द्राक्षबागाचेही मोठे नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी.


मन्सूर खतीब,माजी सभापती

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.