गणपतीपुळेजवळील अपघातात तासगावची तरुणी ठार

0
64



रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेजवळ झालेल्या अपघातात कोमल तानाजी सावंत (वय 22) ही तरुणी जागीच ठार झाली.तर सूरज संपत पाटील (वय 29, रा. सांघलेवाघ, ता. शिराळा, जि. सांगली) हा तरुण जखमी झाला. हे दोघेजण गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते.




 त्याठिकाणी ही दुर्घटना घडली.याबाबत माहिती अशी, सूरज व कोमल हे दोघेजण फिरण्यासाठी शनिवारी सकाळी गणपतीपुळे येथे गेले होते. गणपतीपुळे ते निवळी प्रवास करत असताना करबुडे फाट्याजवळ ट्रकने हुलकावणी दिल्याने सुरजचा बुलेटवरील ताबा सुटला. त्यामुळे दोघेजण रस्त्यावर फेकले गेले.अपघातात कोमल ही जागीच ठार झाली. तर सूरज जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोमलचे नातेवाईकांनी गणपतीपुळेकडे धाव घेतली.कोमलचे वडील तानाजी सावंत हे व्यावसायिक आहेत.





अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आहे. अनेक वर्षे दुसऱ्याच्यात काम करून त्यांनी माधवनगर येथे टाईल्सचे दुकान टाकले आहे. खडतर स्थितीत त्यांनी आपले दुकान नावारूपाला आणले आहे. मात्र सावंत कुटुंबावर आज काळाने घाला घातला आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here