जत,प्रतिनिधी : अचकनहळळी(ता.जत) येथे महाराष्ट्र कामगार सेनाच्या शाखेचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांच्याहस्ते संपन्न झाले.
शाखेचे अध्यक्ष अर्जुन भोसले यांनी आयोजित केला होता.महाराष्ट्र कामगार सेना तालुकाप्रमुख सुरेश घोडके प्रमुख
उपस्थितत होते.यावेळी दिनकर पतंगे यांनी उपस्थित शिवसैनिक,महिलां आणि शेतमजुरांना प्रेरणा दिली.
त्यांच्या मदतीसाठी आम्ही कायम कठीबध्द आहोत असे आश्वासन दिले.जत तालुक्यात सव्वाशे शाखा प्रमुखांचे निवड केल्याचेही पंतगे यांनी सांगितले.लवकरच या सर्व शाखाचे उद्घाटन घेण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष घोड़के यांनी सांगितले.
अचनकहळ्ळी ता.जत येथे कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.







