..अन्यथा केंद्र सरकारला खाली खेचू | महादेव सांळुखे ; टिकाऊ मराठा आरक्षण द्यावे

0
5



जत,प्रतिनिधी : मराठा आरक्षणला सुप्रीम न्यायालयाने स्थगिती दिली आहे.केंद्र सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठीचा निर्णय घ्यावा,अन्यथा केंद्रातील सरकारला खाली खेचू असा,इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव सांळुखे यांनी दिला आहे.




आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ जत येथे मराठा स्वराज्य संघाच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.त्यावेळी सांळुखे बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, अँड.ईश्वर हादीमनी,अँड.रणधीर कदम,रमेश शिंदे,प्रंशात गायकवाड,संग्राम पाटील,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रध्दा शिंदे,गौरी गायकवाड,तेजस्विनी व्हनमाने,दिपाली भोसले उपस्थित होते.




सांळुखे पुढे म्हणाले कि,

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.त्यांनी राज्यात,केंद्रात सत्ता असतानाही टिकणारे आरक्षण दिले नाही.परिणामी मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड संताप आहे.




प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं.त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनसुद्धा अँडमिशन मिळत नाही.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा.मेरिटवर सर्वांची निवड करा.




सुभाष गायकवाड म्हणाले, मराठा समाजाला कायम स्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे,यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.लोकसभा व राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव पास करावा,राज्य घटना परिशिष्ट 9 मध्ये त्यांचा समावेश करावा,त्यावर महामहिम राष्ट्रपतीची सही घ्यावी,तरच मराठा आरक्षण टिकाऊ होणार आहे. यासाठी शासनाला आठवण करून देण्यासाठी डफळापूर येथे एक दिवशीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.





जत येथील एक दिवशी आंदोलनात मागण्याचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here