जत,प्रतिनिधी : उमदी (ता.जत) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ता. 28 ते बुधवार ता.30 संप्टेबर पर्यत जनता कर्फ्यू पुकारला आहे.सोमवारी पहिल्या दिवशी या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला.उमदी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा मोठा धोका बळावला आहे. त्यामुळे गावात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. सोमवारी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.सर्व रस्ते निर्मूष्य झाले होते.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी : वर्षा शिंदे
उमदीत आजपर्यत कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन, जनता कर्फ्यू करण्यात आले आहेत.आताही कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.त्यामुळे गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये,कोरोनाची साखळी तुटावी यासाठी व्यापाऱ्यांकडून हा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे.कोरोना पासून बचावासाठी मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटायझरचा वापर करावा.
सौ.वर्षा शिंदे,संरपच उमदी







