जतेेत शुक्रवारपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

0
2



जत,प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून जतकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी शुक्रवार (दि. 11) ते रविवार (दि.20) पर्यंत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंगळवारी घेतला. 

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय पुढील दहा दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत.जनता कर्प्यू,कोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी  व्यापारी असोसिएशनचे,राजकीय पक्ष, विविध संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समिती सोमवारी स्थापन करण्यात आली होती.बैठकीला समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता म्हणून विविध तालुके आणि गावांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे.त्यापार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी बचत भवन येथे समन्वय समितीचे सदस्य व्यापारी,व्यावसायिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.



त्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सभासदांनी संमिश्र मते मांडली.अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याची घोषणा रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली.

जनता कर्फ्यू करण्याबाबत काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये लॉकडाऊन करायचे असेल, तर कडक करा.औषध दुकाने, कृषी दुकाने आणि दुध हे वगळता अन्य सर्व काही बंद ठेवावे,अशी विनंती प्रशासनाला करणार आहे.



किराणा भुसार,बेकरी,हॉटेल,कापड,मोबाईल शॉपी,भांडी,ज्वेलर्स,आदीं व्यवसायिकांच्या असोसिएशनने या लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याचे ठरविले आहे.जत शहरात लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यू करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा विचार आहे. दि.11 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊन केले जाणार आहे.



लोकांनी दोन दिवसांत आवश्यक ते खरेदी करून घ्यावे.

प्रत्येक सभासदांना मत मांडण्याची संधी मिळावी म्हणून ही बैठक घेण्यात आली. सर्व काही बंद राहिल्यास व्यापार, व्यवसायही आपोआप बंद ठेवावे लागणार आहेत.सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी जनता कर्फ्यु करण्यास पाठिंबा दिला आहे,तसे पत्र देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष श्री.कांबळे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड,तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,दलित पँथर नेते भुपेंद्र कांबळे,शिवसेना जेष्ठ नेते दिनकर पतंगे, जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,गौतम  ऐवळे,जयंत भोसले, बसपा तालुका अध्यक्ष तानाजी व्हनखंडे,कापड व्यापारी असोशियनचे पांडुरंग बामणे,सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर माळी,व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रजवल साळे,दिनेश जाधव,सचिन जाधव, जारीक अपराज,किशोर कोहळी आदी सदस्य उपस्थित होते.



जत बंदबाबत नगरपरिषदेला समन्वय समितीच्या वतीने कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे निवेदन देण्यात आले होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here