जत तहसील कार्यालयात दलालाचा सुळसुळाट

0जत,प्रतिनिधी : जत तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व जत तालुक्यातील तलाठी कार्यालयात दलालाचा सुळसुळाट झाला आहे.साध्या दाखल्यापासून प्रांतकार्यालयातील दाखल्यापर्यत हे दलाल कार्यरत आहेत.अधिकाऱ्यांचा यांना छुपा पांठिब्याने या दलालाना बळ मिळत आहेत.कोरोनाचे कारण देत थेट आलेल्या नागरिकांची कामे टाळली जात आहेत.मात्र दुसरीकडे अशा दलालाकडून आलेली कामे तात्काळ केली जात आहेत,हे विशेष.

तहसील कार्यालयात पुरवठा,जूने दस्तावेज़,दुय्यम निंबधक विविध पेन्शन,योजनासह महसूलच्या विविध 

विभागात असणारा दलालाचा वावर नेमके ही कार्यालये नेमके कुणाच्या ताब्यात आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rate Cardतालुक्यातील महसूलच्या साध्ये प्रमाणपत्र,रेशनकार्ड पासून विविध शासकीय योजनेसाच्या कागदपत्रसाठी दलालाकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत.तालुक्यातील प्रत्येक गावातील दोन-तीन दलालाचा तळ जत तहसील कार्यालयात असतो.नागरिक नसतानाही तेच तहसील कार्यालयात कामे करताना दिसत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अशा दलालाचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.