जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने शहरातील शासकीय कार्यालयात येणारी तालुक्यातील नागरिकांची संख्या कमालीची कमी झाली असून कार्यालये सामसूम झाली आहेत.शहरातील कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.तरीही दहा दिवसाच्या लॉकडाऊन नंतर शहरातील तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे,प्रांताधिकारी कार्यालय,नगरपरिषद आदी प्रमुख कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली आहे.
कार्यालयात अधिकारी,कर्मचारी वगळता एकादा दुसरा नागरिक कार्यालयात गेल्या चार दिवसात दिसून येत आहे.दरम्यान सर्वाधिक गर्दी होणारे दुय्यम निंबधक कार्यालय कन्टेंटमेट झोनमध्ये आल्याने अद्यापही बंद आहे.