जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शुक्रवारी नव्या सात गावात रुग्ण वाढले आहे.तब्बल आकरा रुग्ण वाढल्याने तालुका हादरला आहे.
जत शहरातील नदाफ गल्ली येथील एका कंपाऊडरचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोन्याळ गावात कोरोनाने प्रवेश केला आहे.माडग्याळ येथील डॉक्टरांच्या संपर्कातील शेतकऱ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान सोन्याळ गाव पाच दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.माडग्याळ मधील डॉक्टरांच्या संपर्कातील उटगी येथील शेतकऱ्यांलाही कोरोनाची लागण झाली आहे.ते हळ्ळी रस्तावर वास्तव्यास आहेत.
लोहगाव येथील एक महिला,त्यांचा मु लगा,नातू कोरोना बाधित आढळून आले आहेत.जवळा येथील नातेवाईकांच्या संपर्कात ते आले आहेत.शेगाव येथेही कोरोनाचा पुन्हा कोरोना बाधित आढळून आला आहे. त्याशिवाय गुळवंची येथेही कोरोनाने प्रवेश केला आहे.तेथील एकजण कोरोना बाधित आढळून आला आहे.