जतेत विना मास्क फिरणाऱ्या 74 जणावर दंडात्मक कारवाई

0
3

जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात नगरपरिषदेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंडाचा दणका दिला.सुमारे 74 जणाविरोधात विना मास्क  प्रत्येकी 100 रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला.




शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.शहरातही नुकताच रुग्ण सापडला आहे.त्यामुळे नगरपरिषदे कडून दक्षता घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध चौकात नगरपरिषदेच्या पथकाकडून ही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान यापुढे अशा कारावायात नगरपरिषदेने सातत्य ठेवण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी नागरिकांना आवाहन करूनही त्यांच्याकडून प्रशासनाच्या आदेश बेदखल करण्यात येत आहेत.त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.


जत शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना नगरपरिषदेचे कर्मचारी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here