जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाच जणांना कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले. इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब कॅबिनेट ऑफिसर राजेन्द्र आरळी,कवी राजू सावंत,डॉ नितीन पतंगे आणि प्रगती पतंगे यांना सन्मानित करण्यात आले. या सर्वानी लाॅकडाऊनच्या काळात आपापल्या परीने समाजासाठी झटले.याचीच दखल घेऊन या संस्थेने यांना कोरोना योध्दाने सन्मानित केले.