जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोणत्याही गावात प्रशासनाकडून बंद पुकारण्यात आलेला नाही.कुठल्याही परस्पर बंद करून नागरिकांना वेठीस धरल्यास कायदेशीर कारवाई करू,असा इशारा तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला आहे.
जत तालुक्यातील बिळूरची भिती बाळगत जत शहरासह,तालुक्यातील डफळापूर, उमदी,शेगाव व माडग्याळ येथे बेकायदा बंद पुकारण्यात आला आहे.त्याला प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसतानाही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे.बंदपेक्षा खबरदारी घेण्याची गरज आहे. बंद व त्यानंतर होणारी गर्दी यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सोशल डिस्टसिंगच,मास्कचा वापर,सँनिटायझरचा वापर करावा.कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आम्ही सतर्क आहोत.बिळूर व्यतिरिक्त कोठेही लॉकडाऊन करण्यात आलेले नाही.असेही पाटील यांनी स्पष्ट केले.