जत,प्रतिनिधी : इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ हा आवाज पुन्हा घुमावा अस म्हणत आज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 1 जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.कृषी
विभागाकडून शासन आदेश पाळत सोपस्कर म्हणून स्थानिक काही कृषी दुकानदारासमवेत कृषी दिन साजरा केला जातो.मात्र या कृषी दिनीच बेहाल होत आहे.वरकमाईच्या पैशाला चाटवलेल्या येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा खेळ चालविला आहे.शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवायचे म्हटले तरी वजन ठेवावेच लागत असल्याचे आरोप आहेत. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात शासनाचे पैसे लुटण्याचा प्रकार घडत असल्याचे आरोप आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या या कृषी विभागाची स्थिती कुंपणच शेत खात असल्याची झाली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे.शेती विकासासाठी कृषी विभागाला कोट्यवधींचा निधी येतो. मात्र, हा निधी विभागातील कर्मचारीच खात आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी शेतीशाळा किंवा शेतकरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम न घेता त्याची बनावट बिले तयार करुन निधी हडप करण्याचे उद्योग सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत.घरभाड्यासह विविध प्रकारचे भत्ते घेणारे कृषी मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक त्या-त्या ठिकाणी राहतात काय,असा सवाल उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या या भष्ट्र कारभाराचा पंचनामा करण्याची गरज निर्माण झाली आहे.सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहेच, पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे कृषी सहायकाकडून केले जात असल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचे दर्शनही होत नाही, पण या कर्मचाऱ्याविषयी ओरडही होत नाही. कारण, शेतकरी या पदाकडून होणाऱ्या कार्याबाबत अनभिज्ञच आहे.
कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायक गावातच राहायला हवेत, पण मात्र ते गावात येतच नाहीत. कृषी सहायक हे महिना महिना गावात येत नाहीत. त्यामुळे आम्हाला योजनांबद्दल माहित नाही.योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो, योजना पोचतच नाहीत, गावातच तुम्ही त्यांना हजेरीसाठी बायोमेट्रिक सुरू करा , अशा तीव्र स्वरूपाच्या तक्रारी नेटकरी शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर केल्या आहेत. याशिवाय त्यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याचेही आवाहन केले आहे.
जतमध्ये औषध दुकान तपासणीचा दर 25 हजारावर
खरीप हंगामातील कृषी दुकानाची तपासणीचा जतच्या कृषी अधिकाऱ्यांनी बाजार मांडला आहे.आतापर्यत तीन वेळा तालुक्यातील 200 वर दुकानाची अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्याची माहिती समोर येत आहे. यात भूमीपुत्र म्हणणाऱ्या अधिकाऱ्यासह अनेकांनी कृषी दुकानादारांना लुटल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.या लुटीचा आकडा 5 हजारापासून 25 हजारापर्यत असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे परिणाम या कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू केल्याचे आरोप आहेत.