जत कारखाना चालू करण्याबाबत पालकमंत्री सकारात्मक : बाळासाहेब पाटील

0
2

जत,प्रतिनिधी : जतचा साखर कारखाना सुरु करण्याचा पालकमंत्री जयंत पाटील यांचा विचार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस अभिप्राय अभियान बैठकीत बोलत होते. जतचे नगरसेवक टिमु ऐडके यांनी या बैठकीत जतचा साखर कारखाना सुरू करा व स्थानिक युवकांना या ठिकाणी नोकरी करण्याची संधी द्या अशी मागणी करताच जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी या कारखान्याचा व परिसरातील ऊस लागवडीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले असून ते लवकरच जत येथील साखर कारखाना सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना नोकरीची संधी दिली जाईल असे आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत दिले. तसेच ते म्हणाले की स्थानिक पातळीवरील गट-तट विसरून शरद पवार व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बळकटीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अभिप्राय अभियानास सर्वांनी सहभाग नोंदवावा व महाराष्ट्रात आपला जिल्हा पहिल्या नंबरला येईल यासाठी प्रयत्न करावेत तसेच जे पक्षासाठी काम करतील त्यांना पक्ष नक्कीच संधी देईल असेही आश्वासन यावेळी बाळासाहेब पाटील यांनी दिले.

यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष अँड. बाबासाहेब मुळीक म्हणाले की, जत तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार होण्यासाठी व जिल्हा परिषद , पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामास लागावे यासाठी लागेल ती मदत पक्ष करेल.तसेच जत तालुक्यात येणारे पाणी हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने आले आहे. लवकरच जत पूर्व भागातील 42 गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जयंत पाटील हे कटिबद्ध असून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाणीप्रश्नावरती शेतकऱ्यांची  बैठक जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्याचे आव्हान त्यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले. तसेच युवकांनी व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील बाबासाहेब मुळीक यांनी केले.

यावेळी कार्याध्यक्ष अँड.बाबासाहेब मुळीक, युवक जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख, सुरेशराव शिंदे,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, तालुका अध्यक्ष बसवराज धोडमणी, युवक तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, महिला तालुका अध्यक्ष मिनाक्षी अक्की, अँड.चन्नापाण्णा होर्तीकर, अँड.आण्णाराया रेवूर, रमेश पाटील, मन्सूर खतीब, माजी उपसभापती शिवाजी शिंदे, जे.के.माळी,मच्छिंद्र वाघमोडे, नगरसेवक टिमु ऐडके, शिवनिगप्पा बगली, बाबु नागोंड, रवी शिवपुरे,अशोक कोळी,किरण बिज्जरगी,शफिक इनामदार, हेमंत खाडे आदीजन उपस्थित होते.

जत येथील अभिप्राय अभियानात बोलताना बाळासाहेब पाटील

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here