विजापूर-गुहागर रस्ता पुन्हा राडेराड
जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या विजापूर -गुहागर महामार्गाचे काम अनेक दिवसापासून रखडल्याने खड्डे त्यात पाऊसाचे पाणी साठून झालेली डबकी यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
जत शहरातून गेलेल्या या मार्गाचे शेगाव चौक ते चडचण रोडपर्यतचे काम गेल्या गेल्या वर्षापासून रखडलेले आहे.
गेल्या चार महिन्यापुर्वी मुळ रस्ता सोडून काम करण्यात येत होते.मुळात
मार्गाच्या मोजणीवरून वाद आहेत.मुळ रस्ता सोडून काम होत असल्याचे आरोप करत माजी आमदार विलासराव जगताप यांनी चार महिन्यापुर्वी रस्त्याच्या कामाला आक्षेप घेत मुळ मोजणीनुसार काम करण्याच्या सुचना ठेकेदाराला देत तशी रितसर तक्रार संबधित विभागाकडे केली होती.

गेल्या आठवड्यात विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मुळ मोजणीनुसार कामकरावे अशा सुचना ठेकेदार कंपनी व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.काम सुरू होणार असे अनेक वेळा सांगण्यात आले.लॉकडाऊनचा काळ संपला,आदेश देऊनही प्रत्यक्षात कामे सुरू नाहीत.
परिणामी या मार्गावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.त्यातच
गेल्या तीन दिवसापासून जतेत संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे संपुर्ण रस्त्यावर चिखल,डबकी व राडेराड निर्माण झाली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान शहरातीलही अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत.