जत,प्रतिनिधी : शिंगणापूर हद्दीत सुरू असलेल्या जिरग्याळ-पांडेगाव रस्त्याच्या मुरमीकरण, डांबरीकरणाचे काम निकृष्ठ होत असून मुरमीकरण रस्त्यावर माती टाकण्याचा प्रकार झाला आहे.तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांने यांची पाहणी करून दर्जेदार काम करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा संरपच आण्णासाहेब पांढरे यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर जिरग्याळ-पांडेगाव या जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे शिंगणापूरमधील पाण्याची टाकी ते शेळकेवाडीकडे जाणाऱ्या एक किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण,डांबरीकरणाचे काम सुरू आहे.यात मुरमीकरण करताना मुरमाऐवजी माती टाकून मुरमीकरण करण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता उखडणार आहे.यावर कोणत्याही अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नाही.ठेकेदारांकडून मनमानी प्रमाणे काम केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची पाहणी करून दर्जेदार काम करण्यात यावे,अन्यथा आंदोलन करू,असा इशारी संरपच आण्णासाहेब पांढरे यांनी दिला आहे.
शेळकेवाडी-शिंगणापूर रस्त्यावर मुरमीकरण कामात माती टाकण्यात येत आहे.