जत | मोराची शिकार करणाऱ्या तीघांना पकडले | वाषाण नजिक घाटात करत होते शिकार

0
2

जत,प्रतिनिधी : वाषाण ता.जत जवळच्या घाटात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या तिघांना नगरसेवकांच्या दक्षतेमुळे पकडण़्यात यश आले.शशिकांत परबू पवार,(वय- 80,रा.हळ्ळी,ता.जत),लक्ष्मण पाकण्या पवार(वय-80,रा.आरग,ता.मिरज),जयवंत दिलीप काळे(वय-30,रा.धुळगाव सोनी,ता.तासगाव)अशी अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे आहे.

दरम्यान मयत मोरासह तिघां शिकाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.तिघांनी ताब्यात घेतले असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जत तालुक्यात चोरट्या मार्गाने वन्य प्राण्याची शिकार वाढत आहे.जत-डफळापूर मार्गावर वाषाण नजिकच्या घाटातील धनदाट झाडीत मोरासह,लांडोर पक्षाचे वास्तव आहे.

अनेक वेळा हे मोर व लांडोर रस्त्या कडेला वावरत असतात.हे काही शिकाऱ्यांच्या लक्षात आले होते.गुरूवारी तिघा शिकाऱ्यांनी या झाडीतील एका मोराची शिकार केली.मोराला जिंवत मारत ते घेऊन जात असताना त्या मार्गावरून सांगलीकडे जात असलेले भाजपचे नगरसेवक उमेश सांवत,संतोष मोटे व त्यांच्या बरोबरच्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी त्या तिघांना अडवत चौकशी केली.त्यावेळी त्यांच्याकडे मारलेला मोर एका टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी त्या तिघांना पकडत पोलीसांना माहिती दिली.पोलीसांनी घटनास्थळी पोहचत दोघा शिकाऱ्यांसह ताब्यात घेऊन वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.त्या तिघावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,52 सह 50 व 51 अतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वन अधिकारी महादेव मोहिते,एस.के.गुगवाड करत आहेत.तिघांवर कठोर कारवाई होणार हे निश्चित असून यापुढे वन्य प्राण्याच्या शिकाऱ्यांना यामुळे मोठी चपराख बसणार आहे.

सांगलीकडे जाताना संशय जतहून आम्ही सांगलीकडे आमच्या कामासाठी निघालो होतो.वाषाण फाट्यापुढील घाटातून खाली उतरत असताना रस्त्याकडेच्या झाडीत आम्हाला मोराचा कळप दिसला.तेथे तिघेजण संशयास्पद फिरताना दिल्याने आम्ही त्यांना हटकत पिशवीत बघितल्याने हा संतापजनक प्रकार समजला.उमेश सांवत,नगरसेवक,जत

मोराची शिकाऱ्यांना पकडल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here