जत | दलित युवकांच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा : विक्रम ढोणे

0
4

जत,प्रतिनिधी :नागपूर येथील अरविंद बनसोड हत्या प्रकरण व पुणे पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप यांची प्रेमप्रकरणातून झालेली हत्या या दोन्ही हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे उच्चस्तरीय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी व दोन्ही प्रकरणाची केस फास्टट्रक कोर्टात खटला चालवावा अशी, मागणी विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

नागपूर जिल्हातील अरविंद बनसोड रा.पिंपळधर ता.नरखेड येथील युवकाचा 27 मे रोजी भडपवनी येथे संशयास्पद मृत्यू असताना पोलिस प्रशासनाकडून मृत्यूचा तपास योग्य न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून राजकीय दबावापोटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रकरणात किरकोळ 306,34 कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये अँट्रासीटी अंतर्गत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा.

तसेच पुणे पिंपरी चिंचवड येथे रविवार 7 जून रोजी जातीवादी भावनेतून अमानुषपणे मारहाण करून विराज जगताप या बौध्द युवकाची हत्या करण्यात आली.वरील दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून या दोन्ही घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी आणि नागपूर व पुणे पिंपरी चिंचवड येथील घटनांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडितांना न्याय द्यावा,असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी राजेंद्र खांडेकर,पांडुरंग धडस,विलास सरगर, अमोल खांडेकर,विनायक खांडेकर रियाज नाईक आदी उपस्थित होते.

पुणे व नागपूर येथील दलित युवकांच्या हत्येची दोषींवर कठोर कारवाई करावी या निवेदन देताना विक्रम ढोणे व पदाधिकारी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here