जत | कर्नाटकने बेदखल केलेले मजूर आज स्व:गृही परतणार

0
14

जत,प्रतिनिधी : कर्नाटकातील चिरहट्टी ता.अथणी,जि. बेळगाव येथे कोळसा भट्टीवर काम करणारे 101 मजूर कर्नाटक प्रशासनाने दखल न घेतल्याने एका खासगी वाहनाने जत हद्दील बसर्गी गावात आले. गुरूवारी मध्यरात्री ते बसर्गीत आले. स्थानिक प्रशासनाने तहसिलदार यांना याची माहिती दिली. चौकशी केली असता हे सर्व लोक रायगड, पाली अहमदनगर येथील असल्याचे स्पष्ट झाले.त्यांना आज शनिवारी चार बसेसमधून सुखरूप आपल्या गावी पोहोचवले जाणार आहे.आमदार विक्रमसिंह सावंत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक रामदास शेळके, मंडल अधिकारी संदीप मोरे, व आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी याठिकाणी दाखल झाले.स्थानिक पातळीवर या लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्या सर्वांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here