संख,वार्ताहर : कोरोना प्रादुर्भावर मात करण्यासाठी जत तालुक्यातील संख गाव आज दि.20 ते 23 एप्रिल तीन दिवस कडकडीत लॉकडॉऊन करण्यात येणार आहे.अशी माहिती संरपच सौ.सरपंच मंगलताई पाटील यांनी दिली.यासंदर्भात रवीवारी संख ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासनाची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात संपुर्ण गाव तीन दिवस बंदचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपरपंच सदाशिव दर्गाकर, ग्रामविकास अधिकारी कुशाबा नरळे,माजी उपसरपंच एम.आर.जिगजेणी,संख पोलिस चौकीचे हवालदार सुनिल गडदे,पोलिस कॉन्सटेबल इद्रंजित गोदे उपस्थित होते.
कर्नाटकातील विजापूर येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
संख पासून कर्नाटक सिमाभाग 12 किलोमीटरवर आहे.त्याशिवाय विजापूरशी येथील व्यापारी,नागरिकांचा मोठा संपर्क असतो.सध्या विजापूरच्या कोरोना विषाणु प्रभाव वाढू लागल्याने संखसह सीमावर्ती गावे अलर्ट झाली आहेत.या गावांनी कर्नाटकाला जोडणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.तर आता सलग गावातील व्यवहार पुर्णत: बंद करून कोरोनाचा धोका होऊ नये,नागरिकांच्यात सतर्कता यावी,भविष्यात या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यांची खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून संख आजपासून पुढील तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.दवाखाने,मेडिकल वगळता एकही दुकान या तीन दिवसाच्या काळात उघडले जाणार नाही.त्याशिवाय नागरिकांच्या एकत्र येणाऱ्यावरही प्रतिबंध लावण्यात आला आहे.नागरिकांनी या जनता कर्फ्यूला साथ द्यावी,असे आवाहनही संरपच मंगल पाटील यांनी केले आहे.