आंवढी,वार्ताहर : जत तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसाने पिकांचे भयानक नुकसान झाले आहे.काही भागात पाऊस न पडल्याने रब्बीची पिके अक्षरशःवाळून गेली आहेत.असे असताना शासनाचे पिका विमा भरण्याचे पोर्टल बंद आहे.त्यामुळे जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी पिकविम्याला मुकणार आहे.प्रशासनाने पिक विम्याला जत तालुक्यात मुदतवाढ द्यावी अशी मागणी संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे.
सलग तीन वर्षे तालुक्यात दुष्काळ आहे. अवकाळीने नुकसान झाले असे असताना जिल्ह्यातील बाकी सर्व तालुक्यात पीक विमा भरण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे.परंतु पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून सुद्धा जत तालुक्यात आजही विमा भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केलेली नाही.अगोदरच दुष्काळाने व अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.तरी विमा कंपनीने ऑनलाइन प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून मुदत वाढ मिळावी अशी मागणी कोडगसह शेतकऱ्यांनी केली आहेत.