संख,वार्ताहर : मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नुतन आमदार विक्रमसिंह सांवत यांचा संख ता.जत येथे नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार सांवत यांचा उपसरपंच एम.आर.जीगजेणी यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला.यावेळी सुजय शिंदे,बाबासाहेब कोडग,आप्पाराया बिराजदार,पी.एम.माळी, गिरगावचे श्री. पाटील,हणमंतराया पाटील,गुरुसिद्ध बिराजदार,साहेबगौडा पाटील, विठ्ठल सांगोलकर,श्रीशैल वजरशेट्टी,मौला मनेर. आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सांवत म्हणाले,जत तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल सर्वाचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो.जत पूर्व भागाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिण्याचा पाण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे.तो सर्वप्रथम कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी आणून या भागाला पाणीदार करणार आहे.मी आमदार नसताना सुद्धा कर्नाटकाचे माजी मंत्री एम.बी.पाटील यांच्या पुढाकाराने सोडलेल्या पाण्यातून तालुक्यातील तुर्कआसंगी,मोठेवाडी,तिकुंडी,भि
संख ता.जत येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांचा सत्कार करण्यात आला.