बेकायदा वाळू वाहतूकीतील टँक्टर पळविला I काराजनगी येथील प्रकार : पोलीसात गुन्हा दाखल

0
3

जत,प्रतिनिधी : काराजनगी ता.जत येथे ओढा पात्रात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टँक्टर पळवून नेहल्याप्रकरणी टँक्टर मालक खंड सिंध्दू माने रा.काराजनगी यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल झाला.

काराजनगी परिसरातील ओढ्यातून बेकायदा वाळू काढली जात असल्याची माहिती तलाठी विशाल उदगीरे यांना मिळाली होती.त्या आधारे त्याच्या पथकाने छापा मारला त्यात दोन टँक्टर वाळू काढत असताना पकडण्यात आले.मात्र यातील खंडू माने यांचा टँक्टर क्र.एमएच-10,बीएक्स 1377 यात एक ब्रॉस वाळू भरलेली असतानाही जबरदस्तीने घोलेश्वर रोडने पळवून नेहला.गौण खनिज कायदा,शासकीय कामात अडथळा आदी कलमाखाली जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तलाठी विशाल उदगीरे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here