जत | गणेश व्यापारी पतसंस्थेचा सभासदाना 10 टक्के लाभांश : ईटंगी |

0
3

जत,प्रतिनिधी : जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करत संस्था अत्याधुनिक व स्पर्धेच्या युगात सक्षम उभी असेल असे प्रतिपादन चेअरमन मल्लिकार्जुन ईटंगी यांनी केले.

जत शहरातील सर्वात जुनी व व्यापाऱ्यांना आधारस्तंभ असणाऱ्या गणेश व्यापारी पंतसस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली.त्यावेळी ईटंगी बोलत होते.

ईटंगी पुढे म्हणाले,

गणेश नागरी पतसंस्थेची भव्य इमारत सभासदाच्या सेवेत दाखल झाली आहे.त्याचबरोबर कँप्यूराईज्ड व्यवहार,नाविन्यपुर्ण योजना यामुळे संस्थेचा आलेख सतत चढता राहणार आहे. सभासदाचे हित कायम आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहोत,असेही शेवटी ईटंगी म्हणाले. 

अहवाल वाचन अजित ढोबळे यांनी केले.यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन मोहन माळकोटगी,संचालक बसवराज हिट्टी,चंद्रशेखर संख,बसवराज कल्याणी,शैलेश ऐनापुरे,सागर बामणे,सौ.महादेवी काळगी,श्रीमती सुलोचना हत्ती,सौ वर्षाताई संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव सुनिल जेऊर यांनी आभार मानले,सर्व कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here