जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून मी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार आहे,अशी माहिती कॉग्रेसचे नेते अँड.सी.आर.सांगलीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कॉग्रेसमध्ये मी गेल्या चाळीस वर्षापासून काम करत आहेत.मिरज विधानसभा मतदारसंघात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होते. तेथे मला 23 हाजार मते मिळाली होती.आताही तेथे कॉंग्रेस मला उमेदवारी देण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्या कर्मभूमीपेक्षा जत या जन्मभूमीत काम करायचे आहे. त्यामुळे यावेळी मी विधानसभेला कॉग्रेसकडून जतमधून उमेदवारी मागितली आहे.
सांगलीकर म्हणाले,माझा जतशी मोठा संपर्क आहे.गेल्या वीस वर्षापासून मी तालुक्यात काम करत आहे, राजकीय भूमीकेतून तालुक्यातील रस्ते,पाणी,उद्योग यासारख्या रस्तरावर मला काम करायचे आहे.मला तालुक्यासाठी काहीतरी करायचे आहे.वंचित आघाडीमुळे आपल्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कॉग्रेस पक्षातील वरिष्ठांना मी पक्षासाठी काय केले आहे, यांची कल्पना आहे.
जत तालुक्यात पाणी,रस्ते,उद्योगासाठी माझ्याकडे व्हिजन आहे.मला कॉग्रेसकडून तिकिट मिळाल्यास मला वंचित आघाडीतील अनेक जमातीचा मला पांठिबा मिळेल,त्यामुळे माझा विजय होऊ शकतो.प्रस्तापित राजकाणी तालुक्याचा विकास करण्यात कमी पडले आहे.जत तालुक्यातील बेकारी हटविण्यासह पाणी,रस्ते,विज या मुद्यावर ही निवडणूक मी लढविणारच आहे,विजय निश्चित असल्याचा,असा विश्वास शेवटी सांगलीकर व्यक्त केला.
चौकट
40 वर्षात प्रस्तापित कुंटुबातील उमेदवार निवडून आणण्यासाठी मी काम केले आहे. आम्ही आता पन्नाशी ओंलाडली आहे.त्यामुळे कॉग्रेसने यावेळी मला संधी द्यावी,असेही सांगलीकर म्हणाले.