जत,प्रतिनिधी : जत येथे श्री.जगत् ज्योती बसवेश्वर जंयतीनिमित्त शुक्रवारपासून भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.शुक्रवार ता.3 मे रोजी क्रांतीयोगी महात्मा बसवेश्वराच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात आला.त्याशिवाय अन्नदासोहचे आयोजन करण्यात आले. शनिवार ता.4 मे रोजी पं.पु.मृत्युंजय महास्वामीजी कुडलसंगम यांचे प्रवचन संपन्न झाले.प्रवचनासाठी सुमारे 1000 हाजार समाजबांधव उपस्थित होते.
रवीवार ता.5 मे ला महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम तर रात्री राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूरच्या निवृत्त प्राध्यापिका सौ.डॉ.प्रभा वाडकर सांचे “महात्मा बसवकालिन शरणी” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.तसेच अन्न दासोहचे आयोजन करण्यात आले होते.
आज सोमवार ता.6 रोजी सायकांळी 6 ते 8 वाजेपर्यत अकोला येथील अमोल मिटकरी “महात्मा बसवेश्वरांची धर्मक्रांती” या विषयावर बसवेश्वर मंदिराजवळ व्याख्यानाचे आयोजन केले आहे.मंगळवार ता.7 मे रोजी सकाळी 10 वाजता बसवेश्वर चौक येथील बसवेश्वर चौकात ध्वजारोहण,मुर्तीचे पुजन,दुपारी 12 वाजता बसवेश्वर मंदिर येथे पालखी मिरवणूक,दुपारी 12 वाजता जन्मोत्सव(पाळणा),दुपारी 4 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.