उमदी | सुरेश कुळ्ळोली यांच्याकडून स्व:खर्चातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा |

0
3

उमदी,वार्ताहर : उमदी(ता.जत) येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सलग चवथ्या वर्षी सुरेश कुल्लोळी यांनी स्वखर्चाने गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.या टँकरच्या दिवसातून पाच-सात खेपाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,असेही यावेळी सुरेश कुऴोऴी यांनी सांगितले.

उमदी हे जत तालुक्याच्या शेवटचे गाव या गावाकडे प्रशासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणीटंचाई तीव्र बनली आहे.घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे उमदी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याच्या हेतूने सुरेश कुऴोऴी यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे ठरवले आहे.रवीवारी पहिला टँकर गावाचा कोळी गल्ली मध्ये सुरू झाला.यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.गावात तीव्र पाणीटंचाई असताना, गावाला टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी दाखवलेले मोठे धाडस आहे.

उमदी गावची वीस हजार लोकसंख्या आहे, लोकांचे पाण्याची गरज पाहता प्रशासनाकडून सुरू असलेल्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही लोकांची पाण्याची मागणी जास्त असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

उमदी ता.जत येथे सुरेश कुळ्ळोली यांनी स्व:खर्चातून गावात मोफत पाणी पुरवठा सुरू केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here