माडग्याळ I खा.संजयकाकांचा 52 गावात झंझावत प्रचार I

0

माडग्याळ, वार्ताहर : भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांनी गेल्या दोन दिवसात जत तालुक्यातील 52 गावांत झंझावती दौरा केला.सर्वच गावात मोठा प्रतिसाद मिळाला.

जत तालुक्यात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.त्यात खा.

Rate Card

संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप यांची महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे.सत्ताधारी केंद्र व राज्यातील शासनाकडून हाजारो कोटीची विकासकामे जत तालुक्यात  त्यांनी खेचून आणली आहेत.त्यातून रस्ते,सिंचन योजना,चेकडँम,कँनॉल,सभामंडप,ग्राम पंचायती अतर्गंत मोठी कामे झाली आहे.त्या जोरावर खा.पाटील यांना तालुक्यात चांगला प्रतिसाद दोन दिवस झालेल्या प्रचार दौऱ्यात मिळाला.जतचा विकासाचा अनुषेश भरून काढायचा असेलतर खा.संजयकाकांना पुन्हा संधी द्यावी असे आवाहन जतचे आ.विलासराव जगताप यांनी ठिकठिकाणी घेतलेल्या प्रचारसभेत केले.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते डॉ.रविंद्र आरळी,माजी सभापती प्रकाश जमदाडे,तम्माणगोंडा रवी पाटील,शिवाजीराव ताड,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जत तालुक्यातील खा.संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभांना अशी तूफान गर्दी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.