वज्रवाडमधील शाळकरी मुलीचा खून ? विहिरीत सापडला संशयास्पद मृत्तदेह

0
4

गावात संताप,असे कृत्य करणाऱ्या नराधमाला पकडण्याची मागणी

 

जत,गुगवाड,वार्ताहर : जत तालुक्यातील वज्रवाड येथील अक्षरा पाैडय्या मठपती(वय-11) ही इयत्ता 4 थीत शिकणारी शाळकरी मुलगी गुरूवारी सकाळी अचानक गायब झाली होती. तीचा शनिवारी सकाळी घरापासून काही अंतरावरील रमेश पांडूरंग बनसोडे यांच्या विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.अक्षराचा संशयास्पद मृत्तदेह आढळल्याने तिंच्यावर अतिप्रंसग  झाला असण्याची चर्चा घटनास्थळी होती.दरम्यान नागरिकातून संताप व्यक्त होत होता.हे कृत्य करणाऱ्यांना शोधून कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 

अक्षरा ही वज्रवाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलाबाद रोडवरील वस्तीवर रहात होती.ती वज्रवाड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चाैथीत शिकत होती. गुरूवारी सकाळी 11 वाजता सकाळ सत्रामधील शाळा सुटल्यानंतर अन्य तीन मैत्रणीसह घरी जात होती.त्यादरम्यान अक्षराची आई वाटेत तिला भेटली होती.आई जतकडे बाजारासाठी चालली होती,अक्षराला बाजारातून खाऊ आणतो म्हणून सांगत वाटेकडेनी व्यवस्थित जा म्हणून सांगून आई जत गेली,अक्षराच्या घरापासून दोनशे मीटर अंतरावरील मैत्रणी त्यांच्या घरी गेल्या तेथून पुढे दोनशे मीटर अंतरावरून अक्षरा गायब झाली होती.तर त्यादरम्यानच्या रस्त्याकडेच्या रमेश बनसोडे यांच्या विहिरीत मृत्तदेह सापडलाने संशय बळावला आहे.मनाला हेलावणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या विहीरीत शुक्रवारी फूटभरच पाणी होते.पोलीस व नागरिकांनी विहीरीत तपासणी केली होती.शनिवारी सकाळी शेतकऱ्यास मृतदेह दिसून आला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रूग्णालयात आणला होता.मात्र सायंकाळी तो मिरज शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.अक्षराच्या अंगावर अनेक जखमा होत्या.त्यामुळे खून करून मृत्तदेह विहीरीत टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.पोलीसांनी कसून तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी प्रचंड गर्दी

वज्रवाडमधील ज्या विहिरीत अक्षराचा मृत्तदेह आढळला तेथे बघ्याची मोठी गर्दी झाली होती.गुरूवारपासून गायब झालेल्या अक्षराचे रवीवारी अखेर गुढ उकलले.

अत्याचार झाल्याचा संशय

अक्षराच्या मृत्तदेहावर काही जखमा असल्याने  तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आहे.नराधम संशयिताने आपण पकडले जाऊ भितीनेच अक्षराचा खून केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरोपी जवळचे असण्याची शक्यता

अक्षराचे अपहरण झाल्यापासून मृत्तदेह सापडण्यापर्यत अनेक गोष्ठी संशास्पद आहेत.मुळात अक्षराचे अपहरण करणारा ओळखीच्या इसम असण्याची शक्यता आहे.अनओळखी माणसाने अक्षराचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला असता तर अक्षराने आरडाओरडा केला असता.दुसरे त्याविहिरीत शनीवारी सायकांळी नसणारा मृत्तदेह रवीवारी सकाळी सापडल्याने संशयित जवळचे असण्याची शक्यता व चर्चा घटनास्थळी सुरु होती.

मृत्तदेह रवीवारी पहाटे आढळल्याने गुढ  

अक्षरा गायब झाल्यापासून तिचा कुंटुबिय,नातेवाईक व पोलीसाकडून शोध सुरू होता.घराशेजारी,विहिरीत शोधाशोध केली होती.शनीवारी सायकांळी त्या विहिरीत मृत्तदेह आढळला नव्हता.रवीवारी सकाळी विहीरीचे मालक रमेश बनसोडे हे बोअरमधून विहिरीत सोडलेले पाणी बघण्यासाठी विहिरीत गेले असता त्यांना अक्षराचा मृत्तदेह विहिरीत तरंगताना दिसला.त्यांनी मठपती कुंटुबियाना तातडीने कळविले.शनिवारी सायकांळी नसणारा मृत्तदेह रवीवारी कसा आला यांचे गुढ आहे.

फक्त पाणी साठविण्यासाठी विहिरीचा वापर

मृत्तदेह सापडलेली विहिरीत दुष्काळाने पाणी नाही.कुपनलिका,टँकरमधून आणलेले पाणी साठवण्यासाठी विहिरीचा वापर होतो.मृत्तदेह सापडला तेव्हा विहिरीचे मालक रमेश बनसोडे यांनी कुपनिलिकेतील पाणी करण्यासाठी विहिरीत सोडले होते.अगोदर विहिरीत अल्प पाणी होते.

जत : वज्रवाडमधील या विहिरीत अक्षराचा मृत्तदेह आढळला आहे.घटनास्थळी झालेली बघ्याची गर्दी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here