Untitled Post

0

दोन लहान मुलांचे अपहरण

जत तालुक्यात खळबळ : वायफळमधला दोन वर्षाचा मुलगा,तर वज्रवाडमधून 9 वर्षीय मुलगी गायब

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वज्रवाड येथील अक्षरा सध्दिया मठपती,वय-9 या मुलीचे तर वायफळ येथील शिवराज दिगंबर यादव वय-2 वर्षे या दोन मुलांचे सलग दोन दिवसात अपहरण झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.या घटनेने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.मुलाचे अपहरण झाल्याचे निश्चित झाले,असून जत पोलीसांनी गतीने तपास सुरू केला आहे.पोलीसाची वेगवेगळी पथके विविध भागात मुलाचा शोध घेत आहेत.

Rate Card

याबाबतची अधिक माहिती अशी वज्रवाड येथील 9 वर्षीय अक्षरा ही गुरूवारी सकाळची शाळा असल्याने शाळेला गेली होती.11.00 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी येत असताना अज्ञात व्यक्तीने कशाचेतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचे तिचा काका पावडय्या काडय्या मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.तर वायफळ येथील सैन्यदलात नोकरीस असणाऱ्या दिगंबर यादव यांचा 2 वर्षीय मुलगा शिवराज सकाळी साडेबाराच्या दरम्यान घरातून द्राक्षे खात गावात आला असताना कशाचेतरी आमिष दाखवून अज्ञाताने त्याचे अपहरण केल्याचे शिवराजची आई ज्योती यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दोन्ही घटनेत साम्य असल्याने मुले चोरणाऱ्या टोळीकडून मुलाचे अपहरण झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान दिवसाढवळ्या दोन मुलाचे अपहरण झाल्याने तालुकाभर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील अनेक भागात सकाळच्या सत्रात अंगणवाडी,इग्लिंग स्कूल,प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू आहेत.लहान लहान मुले शाळेसाठी लांबहून येतात.अनेक ठिकाणी अडवळणच्या वस्ती,घरातून चालत मुले-मुली येत आहेत.या अपहरण प्रकरणामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्रत्यक्षात या दोन्ही मुलांचे अपहरण टोळी,अथवा अन्य चोरट्यांनी केले असल्यास मोठी भिती आहे.दरम्यान पोलीसानी गंभीर तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीसाचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.दोन्ही ठिकाणी मुले नेहताना अन्य कोणी बघितले आहे काय,त्याच्या सोबत कोण होते का, परिसरातील मोबाइल लोकेशनसह अन्य बाबीसह सर्व शक्यता पोलीस तपासत आहेत.मुलाचे अपहरण झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.त्याअनुषंगाने गतीने आम्ही तपास करत आहोत.सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षिता पाळावी,लहान मुले घरापासून लांब एकटी जाऊ नयेत यांची खबरदारी घ्यावी.असे आवाहन जत पोलीसाच्या वतीने करण्यात आले आहे.पोलीस स्थानिक नागरिकांकडून सौशल मिडियावरून मुलांच्या फोटोसह माहिती पाठवून शोध घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.