डफळापूर, वार्ताहर : मिरवाड (ता.जत)येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी खासदार संजयकाका पाटील,माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि.प. सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,अप्पा मासाळ,भाजपचे नेते श्रीपाद अष्टेकर,परशुराम चव्हाण सर,सिध्दू गावडे,सागर सवदे,काकासो कांबळे, सज्जन शिंदे उपस्थित होते.डफळापूर पासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर मिरवाड गाव आहे.गावाला लांब पल्ल्याच्या वाड्या-वस्त्या असल्यामुळे आरोग्याच्या सुविधा साठी इथे गंभीर होता.कोणत्याही सामान्य आजारालाही दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारून डफळापूर किंवा जत येथे जावे लागत.होते.त्यामुळे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रूपाली पाटील,राम पाटील,माजी सरपंच कलावती कांबळे,माजी उपसरपंच सुरेखा तोडकर, यांनी यासाठी पाठपुरावा करत प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीची मुख्य रस्त्यालगत जागा या केंद्रासाठी देण्यात आली होती.तेथे आता सुंदर असे आरोग्य उपकेंद्र उभारले आहे.या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रत्यक्षात येथे लवकरच काम सुरू होत आहे.
मिरवाड ता.जत येथील आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करताना आ.विलासराव जगताप,खा.संजयकाका पाटील,प्रकाश जमदाडे,दिग्विजय चव्हाण आदी,केंद्राची भव्य इमारत