माडग्याळ,वार्ताहर : जत पूर्व भागातील बेचाळीस गावात सिंचन योजनेतून पाणी आणण्याचा विडा उचललेल्या गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी गेल्या चार दिवसांपासून माडग्याळ येथील 27 फेंब्रुवारीच्या शेतकरी मेळावासाठी पूर्वतयारीच्या बैठकांना तुफान प्रतिसाद लाभत आहे. प्रत्येक गावात महाराज तुम्ही घेतलेले काम फार महत्त्वाचे आहे.ते तडीस नेहा,आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू अशी ग्वाही तालुक्यातील पुर्व भागातील प्रत्येक गावात लोकप्रतिनिधी शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळत आहे.पूर्वभागातील सिंचनापासून वचिंत चाळीस गावात पाणी आणण्यासाठी 27 तारखेचा माडग्याळ येथील भव्य शेतकरी मिळाव्याला पुर्व भागातील गावे बंद करून पाठिंबा देऊ असे सर्व गावातील नागरिकांनी तुकाराम महाराजांना सांगितले.त्यामुळे पूर्व भागातील 27 तारीखेचा शेतकरी मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सर्व गावे बंद पुकारून होणारा शेतकऱ्याचा मेळावा शासनाला विचार करायला लावणारा ठरणार आहे. या अराजकीय मेळाव्यात परिसरातील तमाम लोकप्रतिनिधी,शेतकरी,जनतेनी सहभागी व्हावे,अशी आर्त हाक तुकाराम महाराज प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना देत आहेत.गेल्या चार दिवसांपासून या बैठकांना जोर आला आहे.पहिल्या दिवशी माडग्याळ परिसरात बैठका झाल्या.दुसऱ्या दिवशी अंकलगी,करजगी, बेळोंडगी,हळ्ळी,बालगाव अक्कलवाडी,बोर्गी या गावात बैठका झाल्या. तिसऱ्या दिवशी बंडगरवाडी, लकडेवाडी,जाडरबोबलाद, गारळेवाडी,सोन्याळ,कारंडेवाडी,उटगी,उमदी,सोनलगी, सुसलाद,निगडी तांडा या परिसरात तुकाराम महाराजांनी येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. चौथ्या दिवशी व्हसपेठ,कोळीगीरी,वळसंग शेंड्याळ,दरिकोणूर,सिद्धनाथ,जाल्याळ,दरीबडची या भागात दौरा करत तुकाराम महाराजानी संवाद साधत मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान केले.सर्वत्र महाराजांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.गावे बंद ठेवून आम्ही मेळाव्यात सहभागी होऊ असे या भागातील लोकांनी ग्रामस्थांनी तुकाराम महाराजांना हमी दिली आहे.काही गावातील आठवडा बाजारात फेरफटका मारून तेथील व्यापारी नागरिकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. चूल,गाव बंद करून,शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी नेतृत्व केलेला तुकाराम महाराजांना आम्ही पाठिंबा देऊ असेही शेतकऱ्यांनी बांधापर्यत आलेल्या तुकाराम महाराजांना सांगितले.27 तारखेच्या शेतकरी मिळाला सुमारे वीस हाजार लोकांची उपस्थिती असणार आहे.येथे पुढील लढा कसा उभारायचा यावर विचारमंथन होणार आहे.पाणीटंचाईने होरफळलेला माडग्याळचा बाजार कट्टा या ऐतिहासिक आंदोलनाचे दिशा ठरणार ठरेल.त्यामुळे जत पूर्व भागासह तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावांनी यात सामील होत आंदोलनाचा लढ्याला साथ द्यावी, तुकाराम महाराज यापेक्षा शासनाला जाग आणण्यासाठी मोठे आंदोलन करायचे आहे,पाणी देण्यासाठी शासनावर दबाव वाढविण्याची वेळ आता आली आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी सहभागी होत साथ द्यावी,असे आवाहन संयोजक तुकाराम महाराज यांना केले आहे.त्याच्या पूर्वतयारीच्या टीममध्ये माडग्याळचे सरपंच इराण्णा जत्ती,लिंबाजी माळी, जेटलींग कोरे,कामांण्णा बंडगर,मल्लू धुमाळे, बाळासाहेब कोरे,पांडुरंग माळी,श्रीशैल कोरे,मारुती माळी,बळवंत जाधव, सिद्धाप्पा माळी,विजय वाघमारे परिश्रम घेत आहेत. उरलेल्या गावातील दोन दिवसात दौरा पूर्ण करून सर्व ग्रामस्थांना आम्ही आव्हान करणार आहोत असे संयोजकांनी सांगितले.