बेंळूखीत चार बंधारे कोरडे ठणठणीत,पिण्यासाठी पाणी द्या,नागरिकांचा आक्रोश

0
2

चार महिने पाणी टंचाईच्या मरणयातना सोसाव्या लागणार

खरी पिण्याच्या पाण्याची गरज असणाऱ्या बंधाऱ्यांना वगळले : ग्रामस्थाचा संताप

डफळापूर, वार्ताहर : बेंळूखी ता.जत येथे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडलेले जात होते.मात्र पाणी शेवटच्या बंधाऱ्यात जाण्याअगोदरच बंद केल्याने गावालगचे तीन महत्वाच्या बंधाऱ्यात पाणी आले नाही.पाण्यासाठी मरणयातना भोगणाऱ्या गाव भागातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून तातडीने या बंधाऱ्यात पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गाव भागातील नागरिकांनी दिला आहे.बाज,बेंळूखी, डफळापूर साठी म्हैसाळ योजनेच्या देवानळ कालव्यातून पाणी सोडले जात आहे.बेंळूखीत दोन दिवस पाणी सोडण्यात आले त्यात गबूरे वस्ती येथून खालील बंधारे भरण्यात आले.मात्र नेमके पिण्याची पाण्याची मोठी टंचाई असणाऱ्या गाव भागालगचे बंधाऱ्यात पाणी येण्याअगोदर वरून पाणी अन्यायकारक बंद करण्यात आले आहे.परिणामी महादेव माळी,जि.प.शाळेजवळचा,व संदानंद मंदिरालगतेचे तीन महत्वाचे बंधारे कोरडे ठणठणीत राहिले आहेत.सध्या गाव भागात तीव्र पाणी टंचाई आहे. नागरिक अर्धा किलोमीटर येथून पाणी आणत आहेत.या बंधाऱ्यात पाणी येईल व गावातील कुपनलिकांना पाणी वाढेल या आशेवर नागरिक संयम ठेवून होते.संध्या गावातील कुपनिकातून घागरभरही पाणी येत नाही.त्यातच म्हैसाळचे पाणी बंधाऱ्यात सोडले नसल्याने चार महिने पाण्यासाठी मरणयातना सहनकराव्या लागणार आहेत.त्यातच गावात पाणी सोडले म्हणून टँकरही मिळणार नसल्याने गावभागातील नागरिक संप्तत झा ले असून त्यांनी थेट अंदोलनाचा इशारा दिला आहे.या बंधाऱ्यात तातडीने पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे.


बेंळूखीतील या बंधाऱ्यात पाणी आले नाही.सर्वाधिक गरज या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची गरज असल्याचा माहिती संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी दिली होती.त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोटकरून याकडे  दुर्लक्ष करत नागरिकांना बेदखल केले.परिणामी जे थे पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे असताना बंधारे वगळे खरेतर कोणत्या नियमात बसते यावर खासदार,आमदार व लोकप्रतिनीधीनी विचारमंथन करण्याची गरज आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here