महिन्यात खूनाच्या दोन घटना,संशयित आरोपीस अटक ; पुर्व भाग होतोय अतिसंवेदनशील
जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे महिनाभरात खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत. गावगुुंड हणमंत महादेव माने, (वय-24,रा.जालिहाळ बुद्रुक) या तरुणाचा पूर्ववैमनास्यातून डोक्यात दाडक्याने प्रहार करून खून करण्यात आला. याप्रकरणी आमगोंडा कोडगानूर यांस उमदी पोलीसांनी अटक केली.सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी जालिहाळ खुर्द येथे महिन्यापुर्वी अवधूत कांबळे या तरूणाचा खून झाला होता.त्यात हणमंत महादेव माने हा संशयित होता.त्याचाही महिनाभरात खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
हणमंत व संशयित आमगोडा कोडगानूर या दोघांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.यापूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. याच भांडणाचा राग मनात ठेवून संशयित आरोपीने हा खून केल्याचे समोर आले आहे.
हणमंत व आमगोंडा यांच्यातील वाद मिटविण्याकरिता गावात सोमवारी रात्री बैठक बसली होती.गावातील पांडू भोसले, सिध्दू भोसले,सिध्दू बिराजदार व मलकू पुजारी यांनी ही बैठक ग्रामपंचायत जवळ घेतली होती.
गावकऱ्यांनी दोघांनाही ताकीद दिली होती. परंतु यावेळी हा वाद मिटला नाही. बैठकीच्या ठिकाणीच दोघांचे जोरदार भांडण सुरु झाले. दोघेही एकमेकांवर तुटून पडले.यावेळी आमगोडा याने लाकडी काठीने हणमंतच्या डोक्यात प्रहार केला.तो खाली पडल्यानंतर त्याचे डोके ठेचले.अधिक रक्तस्त्राव झाल्याने हणमंतचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.याप्रकरणी
फिर्याद मयतचा भाऊ रमेश महादेव माने यांनी उमदी पोलिसात दिली आहे.हणमंत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.त्याच्यावर यापुर्वी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहे. संशयित आमगोंडा यास अटक करण्यात आली आहे.





